Home क्राइम वॉच आंबिवलीची ईराणी वस्ती पुन्हा चर्चेत : ताब्यात घेतलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलीसांवर तुफान...

आंबिवलीची ईराणी वस्ती पुन्हा चर्चेत : ताब्यात घेतलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलीसांवर तुफान दगडफेक

कल्याण दि.5 डिसेंबर :
कल्याणजवळील आंबिवली येथील ईराणी वस्ती आपल्या कारनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका आरोपीला पकडून ताब्यात घेतलेल्या पोलिसांच्या पथकावर याठिकाणी तुफान दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुंबईतील हे पोलीस असल्याची माहिती आहे. (Ambivali’s Irani basti in light again: Stones pelted on police to release detained accused)

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पकडून पोलीस आंबिवली स्टेशनवर आले असता अचानक काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू झाली. रेल्वे ट्रॅकखाली असणारे दगड उचलून पोलिसांवर भिरकावले जात होते. तर त्याच वेळी काही महिला या आरोपीला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा सर्व प्रकार सोशल मीडियावर आलेल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

हे पोलीस मुंबईतील नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्याचे होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा