Home क्राइम वॉच महावितरणच्या टिटवाळा उपविभागामध्ये २४ लाखांची वीजचोरी उघड; ८७ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल

महावितरणच्या टिटवाळा उपविभागामध्ये २४ लाखांची वीजचोरी उघड; ८७ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल

कल्याण दि.3 डिसेंबर :
महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असून नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या तपासणीत २४ लाख २० हजार रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. याप्रकरणी ८७ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Electricity theft of 24 lakhs revealed in Titwala sub-division of Mahavitaran; Cases registered against 87 electricity thieves)

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत टिटवाळा मंदिर परिसर, बल्याणी, बनेली, मांडा पश्चिम भागातील ४० तर गोवेली शाखेंतर्गत म्हारळ – वरप भागात ३३ जणांकडे आणि खडवली परिसरात १४ जणांकडे वीजचोऱ्या आढळून आल्या. चोरीच्या विजेच्या देयक आणि दंडाच्या रकमेचा भरणा टाळणाऱ्या या ८७ जणांविरुद्ध मुरबाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, निलेश शिर्के, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार,अलंकार म्हात्रे आणि त्यांच्या टिमने ही कामगिरी केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा