Home ठळक बातम्या कल्याण पश्चिम आणि उल्हासनगरमधील विजय : देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांचे कौतुक

कल्याण पश्चिम आणि उल्हासनगरमधील विजय : देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांचे कौतुक

कल्याण दि.29 नोव्हेंबर :
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीला घवघवीत असे यश मिळाले आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. तर यावेळी कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. (Victory in Kalyan West and Ulhasnagar: Devendra Fadnavis appreciates Narendra Pawar)

अवघ्या आठवडाभरापूर्वी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळाले आहे. राज्यातील जनतेने शिवसेना, भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अत्यंत भरघोस मतांनी विजयी करत महाविकास आघाडीला अक्षरशः चारही मुंड्या चित केले आहे. त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत “न भूतो..” अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भाजपाचे तब्बल 132 आमदार यंदा बहुमताने निवडून आले आहेत.

भाजपासह महायुतीच्या या महाविजयामध्ये भाजपचे फायरब्रँड नेते देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे आहे. भाजपला ही सुवर्ण कामगिरी करून दिल्याबद्दल कल्याण पश्चिमेतील भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. तसेच या विजयाने राज्यभरातील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून आगामी महापालिका निवडणुकीतही हीच पुनरावृत्ती करण्यासाठी तो सज्ज असल्याचे नरेंद्र पवार यांनी यावेळी फडणवीस यांना सांगितले.

त्या दोन्ही जागांच्या दणदणीत यशाबद्दल देवेंद्र फडणवीसांकडून पवार यांना कौतुकाची थाप…
तर भाजप पक्षश्रेष्ठींकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या खांद्यावर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह उल्हासनगर विधानसभेचे प्रभारीपद देण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर आणि कुमार आयलानी यांना घवघवीत यश मिळाले आहे. या यशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थापही दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा