Home ठळक बातम्या मालमत्ता करवसुली : लाखो रुपयांच्या थकबाकीपोटी केडीएमसीकडून डोंबिवलीत 5 गाळ्यांसह क्रिटिकल केअर...

मालमत्ता करवसुली : लाखो रुपयांच्या थकबाकीपोटी केडीएमसीकडून डोंबिवलीत 5 गाळ्यांसह क्रिटिकल केअर सेंटरही सील

डोंबिवली दि.29 नोव्हेंबर :
मालमत्ता कर भरण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर केडीएमसीकडून आज डोंबिवलीत लाखो रुपयांची थकबाकी असलेले गाळे आणि एक क्रिटिकल केअर सेंटर सील करण्याची कारवाई करण्यात आली. (Property tax collection: KDMC seals 5 critical care centers in Dombivli for arrears of lakhs of rupees)

डोंबिवली पूर्वच्या 8/ग प्रभागक्षेत्रात बिगरनिवासी मालमत्तांना वारंवार नोटीस देवूनही त्यांच्याकडून करभरणा होत नव्हता. त्यामुळे केडीएमसी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार आणि कर निर्धारण- संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8/ग प्रभागाचे सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत, कर अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

डोंबिवली पूर्वेच्या नांदिवली रोड येथील 11 लाख 37 हजार 234 रुपयांच्या थकबाकीपोटी दुकानाचे 5 गाळे तसेच मानपाडा रोडवरील लक्ष्मी निवास येथे असणारे क्रिटीकल केअर सेंटर 7 लाख 16 हजार 743 रुपयांच्या थकबाकीपोटी पोटी सिल करण्यात आल्याची माहिती कर अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी दिली आहे.

तर मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर हा थकबाकी भरण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा