कल्याण दि.25 नोव्हेंबर :
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे आयोजित मॅरॅथॉन अतिशय उत्तमपणे संपन्न झाली. देशभरातून सर्व वयोगटातील मिळून दोन हजारांच्या आसपास धावपटू या मॅरॅथॉनमध्ये सहभागी झाले होते. ज्यामध्ये उल्हासनगरमधील विकास मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. (Kalyan Rotary Marathon Abounds in Excitement; More than 2 thousand runners participated)
रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे चालवल्या जाणाऱ्या रोटरी दिव्यांग सेंटरच्या मदतीसाठी आणि इतर समाजाभिमुख सेवा प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही मॅरेथॉन TDAA (Thane District Athlete Association) आणि AIMS (Association of International Marathon and Distance Races) प्रमाणित होती.
रोटरी स्पोर्टस सर्कल-भंडारी चौक, गांधारी ब्रीज जवळ, नवीन रिंग रोड, कल्याण पश्चिम येथून या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. पूर्ण मॅरॅथॅान पहाटे ३वाजता, अर्ध मॅरॅथॅान पहाटे 5.30 , १० किमी ६ वाजता, ५ किमी ७.३० आणि ३ किमीच्या स्पर्धेला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला.
या संपूर्ण मॅरॅथॉनमधे फार उत्साहवर्धक आणि जल्लोषाचे वातावरणात दिसून आले. कल्याण डोंबिवली महानगर पालिका, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीसांसह अनेक सामाजिक संस्थांचे आयोजनात सहकार्य लाभले.