सकाळी 11.54 :कल्याण पश्चिमेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांनीही सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
सकाळी 11.36.: कल्याण डोंबिवलीतील मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत झालेले मतदान…कल्याण पूर्व – 17.81 टक्के
कल्याण पश्चिम – 17.00 टक्के
डोंबिवली -20.29 टक्के
कल्याण ग्रामीण -19.82 टक्के
उल्हासनगर – 11.33 टक्के
अंबरनाथ – 14.05 टक्के
11.28: विधानसभा निवडणूक LNN Live Updates : 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत 20.29 टक्के मतदान
सकाळी 11.02 :कल्याण पश्चिमेत काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी… कल्याण पश्चिमेतील इंद्रप्रस्थ, केडीएमसी मुख्यालय, प्रफुल्ल पॅराडाइज आदी ठिकाणी तांत्रिक बिघाडाची मतदारांकडून देण्यात आली प्राथमिक माहिती…
सकाळी 10.52: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनीही बजावला मतदानाचा हक्क
सकाळी 10.22 : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…
सकाळी 9.57 :राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
सकाळी 9.43 : सकाळी 7ते 9 या दोन तासांतील ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघात झालेल्या मतदानाची आकडेवारी
सकाळी 9.35 :144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते 9.00* या पहिल्या दोन तासांत झाले 8.27% मतदान .
सकाळी 9.30 :शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
सकाळी 9.22 :मनसेचे उमेदवार प्रमोद(राजू)पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
– काटई जिल्हा परिषदेच्या शाळेत बजावला मतदानाचा हक्क
सकाळी 8.42 : कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…महायुतीची पुन्हा स्थापन होणार असल्याचा विश्वास भोईर यांनी केला व्यक्त…भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचीही यावेळी उपस्थित
सकाळी 8.35 : आम्ही मतदान केले, तुम्हीही करा.. जागरूक कुटुंबियांचे नागरिकांना आवाहन
सकाळी 8.34 :मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडलेल्या जागरूक नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क…
सकाळी 7.19 : : मतदानासाठी कल्याण पश्चिमेतील मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी… मतदान केंद्रांवर लोकांची रांग,महिला मतदारांची संख्या मोठी…