Home ठळक बातम्या मानवतावादी आणि धर्माचे काम करणाऱ्यांनाच मतदान करा – स्वामी भारतानंद सरस्वती यांचे...

मानवतावादी आणि धर्माचे काम करणाऱ्यांनाच मतदान करा – स्वामी भारतानंद सरस्वती यांचे आवाहन

डोंबिवली दि.19 नोव्हेंबर :
धर्माचे पालन करण्यासाठी सत्तेत असताना अनेक महत्वाची कामे केली. म्हणूनच मानवता वादी काम करणाऱ्यांना, धर्माचे पालन करणाऱ्यांना मतदान करा असे आवाहन अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती यांनी केले. ते डोंबिवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Vote only for humanitarians and religious workers – Swami Bharatanand Saraswati’s appeal)

यावेळी शिव रूपानंद स्वामी, स्वामी विश्वानंद वारिंगे यांच्यासह अखिल भारतीय संत समितीचे अनेक संतगण उपस्थित होते.

अखिल भारतीय संत समिती कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. मात्र देव – देश – धर्मासाठी आवश्यक मुद्दे उचलण्याचे काम ही संघटना करत असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे देशद्रोही लोक, देश तोडण्यासाठी प्रयत्न करताना दुर्दैवाने देश जोडण्यासाठी, वाचविण्यासाठी आपल्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याचे दुख त्यांनी व्यक्त केले. म्हणूनच देश वाचवण्यासाठी १०० टक्के मतदान करा. महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल आणि देश वाचला तर धर्म वाचेल असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

महायुतीच्या सरकारने मागील अडीच वर्षाच्या काळात अफजलखानाचे थडगे तोडले, जे तोडण्याची हिंमत न्यायालयाने तीन-तीन वेळा आदेश देऊनही कोणत्याही सरकारकडून दाखविली जात नव्हती. याबरोबरच त्यांनी प्रतापगडावरील, विशाळगडावरील मलंग गडावरील अतिक्रमण हटवून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे काम केले. गो मातेला राज्य मातेचा दर्जा दिला, गो मातेला चाऱ्यासाठी वैरणीसाठी दररोज ५० रुपये अनुदान मंजूर केले. तर काँग्रेस पक्षाला जिहादी मानसिकतेचे लोक हवे आहेत. मात्र त्यामुळे आपला धर्म संकटात सापडण्याची भीती वाढणार आहे, म्हणूनच महायुतीला पुन्हा एकदा सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.

तर देशीविरोधी फतवे काढणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय संत समितीच्या शिव रूपानंद स्वामी यांनी केली.

तर एकीकडे त्यांचे धर्मगुरू एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. त्या बदल्यात त्यांनी केलेल्या १७ मागण्या फार भयानक आहेत. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. हे चित्र पाहता आमचा आमचा धर्म वाचविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याचे सांगत मतदारांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन स्वामी विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा