Home ठळक बातम्या रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली पश्चिमेतील रॅलीला भव्य स्वरूप ; महिला, युवक, ज्येष्ठ...

रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली पश्चिमेतील रॅलीला भव्य स्वरूप ; महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सर्व पक्षीय नेत्यांचा सहभाग

डोंबिवली दि.17 नोव्हेंबर:
सोमवार प्रचाराचा शेवटचा दिवस, बुधवारी सकाळपासून मतदान करायचे आहे, पण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या समर्थनार्थ डोंबिवली पश्चिमेला काढण्यात आलेल्या रॅलीला सर्व पक्षीय नेत्यांसह आबालवृद्ध नागरिकांनी उपस्थित राहून विजयी रॅलीचे स्वरूप आले होते.
विकास म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, संजय पावशे, महापौर विनिता राणे, विश्वनाथ राणे, शैलेश धात्रक, मनीषा धात्रक यांसह समीर चिटणीस, मंदार हळबे, मुकुंद पेडणकेर, सचिन चिटणीस आदी नगरसेवक असंख्य कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. या रॅलीमध्ये तब्बल अडीच किलोमीटरपर्यंत रांग गेली होती.(Ravindra Chavan’s rally in Dombivli West looks grand; Participation of women, youth, senior citizens, all party leaders)

कोपरगांव सुकऱ्या म्हात्रे चौक येथून रॅलीचा प्रारंभ होऊन कोपर रोडमार्गे मा. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथून डाव्या बाजूला वळून कैलास नगरमार्गे तुळशीराम जोशी बंगला चौक (सहयोग कॉर्नर) येथून डाव्या बाजूला वळून जुनी डोंबिवली रोड मार्गे काळू नगर, विष्णुनगर पोलीस स्टेशन वरून रेती बंदर रोड मार्गे क.डों.म.पा. ‘ह’प्रभाग क्षेत्र कार्यालय मार्गे श्रीधर म्हात्रे चौकातून प्रकाश म्हात्रे मार्गावरून मा. विकास म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालय, रागाई मंदिर, वक्रतुंड सोसायटी वरून दक्ष नागरिक चौक, चर्च येथून नवापाडा रोड , सुभाष रोड मार्गे वोडाफोन गॅलरी येथून डाव्या बाजूला वळून महात्मा गांधी मार्गावरून पु. भा. भावे सभागृह येथे रॅलीचा समारोप होणार होता.

परंतु प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने मंत्री चव्हाण यांनी सामान्य नागरिकांना हस्तांदोलन करत देवदर्शन करून नागरिकांचे आशीर्वाद घेतले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा