Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याकडून महत्त्वाच्या विषयांवर वचननामा प्रसिद्ध

कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याकडून महत्त्वाच्या विषयांवर वचननामा प्रसिद्ध

कल्याण दि.17 नोव्हेंबर :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याकडून महत्त्वाच्या विषयांवर वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये मराठा आरक्षणासह कल्याण पश्चिमेतील प्रमूख मुद्द्यांचा समावेश आहे.

या नव्या वचननाम्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवणार, कल्याण मेट्रोचा टिटवाळ्यापर्यंत विस्तार, मेट्रो मार्गामध्ये कल्याणातील व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी, वालधुनी नदी पात्रशेजारी संरक्षक भिंत उभारणे, कल्याणात भव्य संविधान भवन उभारणार, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मारक बांधणार, माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार, खानदेशातील गिरनार – नारपार नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न, उत्तर भारतीय भवन अशा प्रमूख मुद्द्यांचा समावेश आहे. यापूर्वी आम्ही आमच्या वचननाम्याचे प्रकाशन केलेले आहे. मात्र नव्या वचननाम्याची कल्याणातील सामाजिक संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून आखणी करण्यात आली आहे. हे सर्व मुद्दे आपण केवळ हातात घेणार नाही तर ते सोडवण्यासाठी आपण 100 टक्के प्रयत्न करणार असल्याचा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, भाजप ज्येष्ठ नेते दिनेश तावडे, शिवसेना विधानसभ संघटक संजय पाटील यांच्यासह शिवसेना, भाजप, आरपीआयचे प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते.

असा आहे नव्याने जाहीर झालेला वचननामा…

मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवून आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणार.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मराठा समाजासाठी अद्ययावत असे सभागृह उभारण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.

घोलप नगर, योगीधाम, अनुपम नगर परिसरात दरवर्षी पावसाळ्यात वालधुनी नदीला येणाऱ्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते. त्यामूळे वालधुनी नदी पात्रातील गाळ काढणार आणि संरक्षक भिंत उभारण्यासाठी प्रयत्न करणार.

मतदारसंघातील नागरिकांना आपल्याला भेटणे सोयीचे व्हावे यासाठी कल्याण स्टेशन परिसरात भव्य असे जनसंपर्क कार्यालय उभारणार. आणि दर महिन्याला त्याठिकाणी जनता दरबार आयोजित करून नागरिकांचे प्रश्न – तक्रारी तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणार.

रामबाग येथील मध्यवर्ती कार्यालयात मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असणार. तसेच गरजू लोकांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचे या कार्यालयाद्वारे सुलभ पद्धतीने वितरण करणार.

कल्याण स्टेशनमार्गे जाणाऱ्या मेट्रो मार्गामध्ये या भागातील व्यापाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेणार.

कल्याण मेट्रोचे जाळे दुर्गाडी किल्ला, बिर्ला कॉलेज, शहाडमार्गे आंबिवली टिटवाळापर्यंत विस्तारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार.

खानदेशातील महत्त्वाकांक्षी नारपार – गिरनार नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द खानदेश हित संग्राम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवणार.

देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर असणाऱ्या कल्याणातील डॉ.आनंदीबाई जोशी यांचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करणार.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधना प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भव्य असे संविधान भवन उभे केले जाणार.

कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी येथील माता रमाई आंबेडकर उद्यान याठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची इच्छा अजिंठा फाउंडेशनसह कल्याण परिसरातील तमाम आंबेडकरी जनतेने प्रकट केली आहे. त्यांच्या या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून या पुतळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे माता रमाईंचा हा पुतळा लवकरात लवकर उभारण्यात येईल.

माता रमाबाई आंबेडकर नगर आधारवाडी याठिकाणी समाज मंदिर हॉलसाठी माता रमाई आंबेडकर उद्यानालगत ग्रामस्थांसाठी सात गुंठे जागा मिळवून दिली आहे. या जागेमध्ये लवकरच स्थानिक रहिवासी आणि कल्याणमधील आंबेडकरी जनतेसाठी समाज मंदिर हॉल तसेच ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी केंद्र आणि अभ्यासिका उभारण्यात येणार आहे.

मतदारसंघात उत्तर भारतीय नागरिकांसाठी उत्तर भारतीय भवन उभारणार.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा