कल्याण पूर्व दि.18 नोव्हेंबर:
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये कल्याण पूर्वेतील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारासाठी भाजपचे खासदार आणि सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांनी उपस्थिती लावत सुलभा गायकवाड यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
खासदार रवी किशन यांच्या उपस्थितीत निघालेल्या या प्रचार फेरीची सुरवात अवध रामलीला समिती येथून म्हात्रे नाका, काटेमानिवली नाका, नाना पावशे चौक, जनता बँक, काली माता मंदिर येथे समारोप करण्यात आली. (Attendance of BJP MP- Noted actor Ravi Kishan for the campaign of Sulabha Ganpat Gaikwad, candidate of Mahayuti in Kalyan East.)
यावेळी खासदार रवी किशनजी यांनी आपल्या भोजपुरी शैलीत सर्व उत्तर भारतीय समाज बांधवांना सुलभा गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. आम्ही सरकार स्थापन करत आहोत आणि येत्या २३ तारखेला महायुती सरकार शपथ घेणार आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसावी असे त्यांनी भोजपुरी अंदाजात सांगितले. माझी लाडकी बहीण सुलभाताई यांच्यासाठी आपण १ हजार ७०० किलो मिटर लांबून तुम्हा सगळ्यांना भेटायला आलो आहे. माझ्या सर्व उत्तर भारतीय बांधवांना आणि माझ्या फॅन्सना आवाहन करतो की सुलभाताईला प्रचंड बहुमतांनी निवडून द्याल याची मला खात्री आहे.
यावेळी खासदार रवी किशन यांच्यासह सुलभा गणपत गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेंद्र फौजदार शर्मा, जिल्हा सरचिटणीस मनोज राय, उत्तर भारतीय आघाडी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष लल्लन कनोजिया, जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय उपाध्याय, उत्तर भारतीय मोर्चा कल्याण अध्यक्ष सत्यप्रकाश उपाध्याय, महासचिव अविनाश सिंह, अभिषेक तिवारी, शशी तिवारी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला आघाडी सरचिटणीस निशा सिंग, मा नगरसेविका हेमलता पावशे, वरिष्ठ सल्लागार प्रशांत राय, रामजीत सिंग, डॉ पोटदुखे,कैलास पावशे, ॲड सत्येंद्र दुबे, मृत्युंजय शुक्ला, दीपक गुप्ता, संजय तिवारी, सौरभ सिंग, अमिताभ सिंग तसेच इतर मान्यवार उत्तर भारतीय मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.