Home Uncategorised कल्याण पश्चिम विधानसभा: गेल्या 30 वर्षांपासून मामाच्या गावाची महायुतीलाच साथ

कल्याण पश्चिम विधानसभा: गेल्या 30 वर्षांपासून मामाच्या गावाची महायुतीलाच साथ

प्रचारानिमित्त फिरताना मिळाला विश्वनाथ भोईर यांच्या आठवणींना उजाळा

कल्याण दि. 15 नोव्हेंबर :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या विश्वनाथ भोईर यांनी प्रचारानिमित्त संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी आज विश्वनाथ भोईर यांच्या मामाच्या गावामध्ये, म्हणजेच कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 30 वर्षांपासून हे गाव आपल्या आणि शिवसेना भाजप महायुतीच्या पाठीशी उभे राहिल्याचे सांगत या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. (Kalyan West Vidhan Sabha: Mama’s Village has supported Mahayuti for the past 30 years)

निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून कल्याण पश्चिम विधानसभेतील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळताना दिसत आहे. विश्वनाथ भोईर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरल्यापासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. भोईर हे दररोज अतिशय सुनियोजित आणि परिणामकारक पद्धतीने मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधत असून ठिकठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय.

आज गुरुवारी कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात भोईर यांची प्रचाररॅली आयोजित करण्यात आली होती. गौरीपाडा हे विश्वनाथ भोईर यांचे आजोळ म्हणजेच मामाचे गाव. आपल्या या मामाच्या गावातून फिरताना विश्वनाथ भोईर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या भेटीमध्ये भोईर यांनी त्यांचे मामा, मामी, मामे भाऊ, मामे बहिणी, त्यांच्या सुना अशा सर्वांशीच आज संवाद साधला.

तर सुरुवातीपासून हे पूर्ण गाव आपल्या पाठीशी उभे राहिले आहे. आपण ज्यावेळेपासून म्हणजेच 1995 पासून निवडणूक लढवतोय हे गाव आपल्या आणि महायुतीला साथ दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आज आपण या गावाला भेट दिली. जेणेकरून आपल्या आजोळच्या लोकांची भेटही होईल आणि आगामी निवडणुकीत त्यांचे सहकार्याच्या रूपाने आशिर्वाद घेण्यासाठी आपण आल्याचे महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा