येत्या 24 ऑक्टोबरला राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही येणार
कल्याण ग्रामीण दि.21 ऑक्टोबर :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजू पाटील तर ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी आज जाहीर केली. कल्याण ग्रामीणमधील मनसेच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज ठाकरे आज कल्याण ग्रामीणमध्ये आले होते. (Raj Thackeray announced the candidacy of Raju Patil in Kalyan Gramin and Avinash Jadhav in Thane)
आपण याठिकाणी भाषण करण्यासाठी आलेलो नाहीयेत. आज किंवा उद्या आपण पक्षाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मात्र इकडे आलोच आहोत तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजू पाटील आणि ठाण्यातील मनसे जिल्हाध्यक्ष ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करत असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. आणि उपस्थित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यासोबतच येत्या 24 ऑक्टोबर रोजी आपण राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा इकडे येणार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपले भाषण थांबवले.
कल्याण शिळ रोडवर असलेल्या वझे चौकात हे राजू पाटील यांचे हे भव्य निवडणूक कार्यालय उभारण्यात आले आहे.
यावेळी राज ठाकरे यांच्यासह आमदार राजू पाटील, माजी आमदार आणि मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर, डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष राहुल कामत माजी शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह अनेक प्रमूख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.