महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे प्रभारी मुकुल वासनिक यांची घेतली भेट
नवी दिल्ली दि.20 ऑक्टोबर:
काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळामध्ये एकनिष्ठेने आणि पूर्ण ताकदीने असंख्य महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वात चांगले कार्य केले आहे. अशा महिलांना येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे प्रभारी मुकुल वासनिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महिला प्रदेशाध्यक्ष यांनी प्रबळ दावा केला.
महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम विधानसभा १३८ मधून महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, लातूर औसा विधानसभा मधून प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या पाटील, छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा १०९ मधून दिपाली मिसाळ, अकोला पूर्व विधानसभा २९ मधून पूजा काळे,नागपूर उमरेड विधानसभा ५१ मधून प्रतिमा उके आणि त्याच बरोबर यवतमाळ विधानसभा ७८ मधून स्वतः संध्या सव्वालाखे अशा जवळपास महाराष्ट्रातून १५ महिलांसाठी उमेदवारी मागितली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कामाचा आढावा मुकुल वासनिक यांच्याकडे दिला.