विद्यार्थी सुरक्षा आणि उत्कृष्ट शैक्षणिक पद्धतीसाठीही मिळाले पुरस्कार
कल्याण दि.18 ऑक्टोबर :
कल्याणातील नामांकित शाळा अशी ओळख असलेल्या बी.के.बिर्ला पब्लिक शाळेला राष्ट्रीय स्तरावरील ग्रीन स्कूलसह वेस्ट वॉरियर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षा मानांकन आणि शैक्षणिक पद्धतीसाठीही बी. के बिर्ला शाळेने पुरस्कार पटकावले आहेत. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे प्रमूख ओ.आर. चितलांगे यांनी दिली आहे. या विविध राष्ट्रीय पुरस्कारांच्या माध्यमातून बी. के. बिर्ला पब्लिक स्कूलने झपाट्याने बदलणाऱ्या जगात विद्यार्थ्यांच्या यशासाठी शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्य आणि सामाजिक जबाबदारीचे मापदंड प्रस्थापित केल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. (in Kalyan. B. K. Birla Public School felicitated with West Warrior Award along with National Level Green School)
या शाळेने ‘एज्युकेशन टुडे’ने नुकत्याच जाहीर केलेल्या सीबीएसई शाळांच्या पहिल्या २० शाळांमध्ये ठाण्यामधून 2रा तर महाराष्ट्रात 3रा क्रमांक पटकावला आहे. ही शाळा 2023 मध्ये एज्युकेशन टुडेच्या ‘स्कूल मेरिट अवॉर्ड्समध्ये’ भारतातील टॉप 20 सीबीएसई शाळांमध्ये 8 व्या स्थानावर होती. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॉवर आदी पर्यावरणपूरक प्रमुख संकल्पना राबविल्याबद्दल शाळेला दिल्लीस्थित ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्वायर्मेंट’ संस्थेकडून “ग्रीन स्कूल’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. तर ओला आणि सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी या शाळेने देशभरातील 5,000 हून अधिक शाळांमधून “वेस्ट् वॉरियरचा पुरस्कारही मिळवला असल्याचे चितलांगे यांनी सांगितले.
तसेच या शाळेने ‘एज्युकेशन टुडे’ने नुकत्याच जाहीर केलेल्या सीबीएसई शाळांच्या पहिल्या २० शाळांमध्ये ठाण्यातील दुसरा तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही शाळा 2023 मध्ये एज्युकेशन टुडेच्या ‘स्कूल मेरिट अवॉर्ड्समध्ये’ भारतातील टॉप 20 सीबीएसई शाळांमध्ये 8 व्या स्थानावर होती. शाळेला ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्वरमेंट’, दिल्लीकडून शाश्वत पद्धतींसाठी “ग्रीन स्कूल’ म्हणून गौरव करण्यासह नाविन्यपूर्ण कचरा व्यवस्थापनासाठी 5,000+ शाळांमध्ये “वेस्ट् वॉरियर पुरस्कार” मिळाला आहे.
टाइम्स स्कूल सर्व्हे 2023 नुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम प्रदान करणाऱ्या मुंबईतील पहिल्या 20 शाळांमध्ये बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल चौथ्या स्थानावर आहे.विद्यार्थ्यांना भावनिक आणि मानसिक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी,एज्युकेशन वर्ल्डच्या 2022 च्या ग्रँड ज्युरी पुरस्कारात या शाळेने अखिल भारतीय पातळीवर 2सरे स्थान भूषवले आहे.’ माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्य सरकारच्या उपक्रमात शाळेला विभागीय स्तरावर 15 लाखांचे पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांना स्कूल बस चालवण्याचे प्रशिक्षण योजना…
तर विद्यार्थी सुरक्षा डोळ्यासमोर ठेऊन येत्या काळात शाळेत सुरू होणाऱ्या परिवहन सुविधेत शक्यतो महिला चालकांना नियुक्त करण्याचा विचार आहे. इच्छुक महिलांना स्कूल बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणसाठी शाळा प्रशासनाकडून केल्या जाणारे प्रयत्न दिसून येत आहे.
25 वर्षाहून अधिक काळ उत्कृष्ट कामगिरी करणारी संस्था…
शैक्षणिक कर्तृत्व, नैतिक मूल्ये आणि नाविन्यपूर्ण पद्धतीसाठी ओळखली जाणारी कल्याणची बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल ही 25 वर्षानं अधिक काळ उत्कृष्ट कामगिरी करणारी नामवंत संस्था आहे. संशोधनाधारित दृष्टिकोन बाळगून कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणारी, ‘नॅबेट’ मान्यताप्राप्त शाळा आहे.
सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहमीच उत्कृष्ट कामगिरी …
सर्वसमावेशक अभ्यासक्रमासह शाळा बोर्डाच्या परीक्षांपासून ते राष्ट्रीय स्पर्धापर्यंत शैक्षणिक, सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावते. शाळेतील दोन डिझाईन लॅब्समध्ये, स्टेम अभ्यासक्रमाद्वारे सर्जनशीलता आणि समस्या निराकरण कौशल्यांचा विकास केला जातो. शाळेतील व्यवसाय मार्गदर्शन विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांच्या, तसेच अभियोग्यता चाचण्यांच्या माध्यमातून भविष्यकालीन व्यवसाय संधी संबंधी संबंधी विद्यार्थ्यांचे समुपदेशन – मार्गदर्शन केले जाते.
विशेष अध्यापक आणि समुपदेशकांसह सर्व वर्गामध्ये राबवण्यात येणाऱ्या एम-पॉवर संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर बी के बिर्ला पब्लिक स्कूल नेहमीच प्राधान्य देत आले आहे.
सलग चार वर्षे मायक्रोसॉफ्ट शोकेस स्कूल…
शालेय कामकाजात तंत्रस्नेही पद्धती प्राधान्य दिले जाते. सलग चार वर्षे मायक्रोसॉफ्ट शोकेस स्कूल म्हणून, शंभरहून अधिक मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिक एज्युकेटर एक्सपोर्ट्स असलेली ही शाळा, शैक्षणिक विकासासाठी डिजिटल क्लासरूम, स्मार्ट बोर्ड, थ्रीडी लॅब, ही आर तंत्रज्ञानाचा वापर करते. हायब्रीड क्लासरूमद्वारे वैयक्तिक तसेच हर्चुअल अध्ययनातील सुलभ संक्रमण सुनिश्चित केले जाते. शालेय अँपद्वारे पालक आणि शिक्षकांत साधल्या जाणाऱ्या सुलभ संवादामुळे पालकांना आपल्या पाल्याच्या प्रगतीबद्दल अद्ययावत माहिती मिळते. ऑनलाइन उपहारगृहाच्या सुविधेमुळे पालक आपल्या मुलांसाठी पूर्व-मागणी करून जेवणाची व्यवस्था करू शकतात.
‘ग्रेट प्लेस टु वर्क’ चा किताब…
भारतातील 50 मध्यम आकाराच्या नामांकित संस्थांपैकी, शाळेला 92.4 कर्मचारी समाधान निर्देशांकासह ‘ग्रेट प्लेस टु वर्क’ चा किताब मिळाला आहे. शिवाय, सेंटर टीपीओ (Teaching Professional Olympiad) मध्ये शाळेचे शिक्षक बाजी मारतात आणि अनेक शिक्षक दरवर्षी आपापल्या विषयात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवत असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी ओ.आर. चितलांगे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना जांगरा आणि इतर प्रमुख शिक्षक वर्ग उपस्थित होते.