कल्याण दि.29 स्पटेंबर :
असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड पॅरामेडिकल प्रोफेशनल्सतर्फे कल्याणात आयोजित Qualcon २०२४, ही एकदिवसीय परिषद नुकतीच संपन्न झाली. केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत ही परिषद घेण्यात आली.(Registered Paramedical Professionals Association’s qualCon One Day Conference concluded in Kalyan)
या परिषदेला संबोधित करताना डॉ. पानपाटील यांनी या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी असणारे शासकीय धोरण, नविन नियम आदी प्रमूख मुद्द्यांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. खडकपाडा येथील स्प्रिंगटाईम क्लब येथे झालेल्या या परिषदेमध्ये कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील 130 क्लिनिकल लॅबोरेटरी चालक, तंत्रज्ञ आणि PGDMLT विद्यार्थी उपस्थित होते. या परिषदेमध्ये डॉ. मंजुषा श्रीवास्तव, डॉ. वर्षा बिर्ला, मेट्रोपोलीस, डॉ. राशी मेहता, इन्फेक्शन लॅबोरेटरीज, ठाणे आणि डॉ. ओंकार काढणे यांनीही वेगवेगळ्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तर लॅबोरेटरी क्षेत्रातील नविन ट्रेंड्स, नविन पद्धती, प्रगत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, त्याबद्दल ते अद्ययावत राहावे या प्रमुख उद्देशाने ही वार्षिक कॉलकॉन 2024 परिषद आयोजित करण्यात आल्याचे या परिषदेचे संयोजक किशोर देसाई यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनेश नायर, खजिनदार अर्चना चौधरी, कांचन नेने यांच्यासह विविध पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.