कल्याण दि.9 ऑगस्ट :
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला वर्गातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मात्र नारीशक्ती दुत ॲपमध्ये एडिटचा पर्याय उपलब्ध नसल्याने महिला वर्गाचे अर्ज मोठ्या संख्येने बाद केले जात होते.
परंतु याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींकडून शासन स्तरावर ही बाब लक्षात आणून देण्यात आली. त्याची शासनाने तात्काळ दखल घेत नारीशक्ती दुत ऍपमध्ये एडिटचा पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांना आवश्यक ते बदल करून हे अर्ज पुन्हा एकदा अपलोड करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अशा पद्धतीने रीजेक्ट झाले असतील त्यांनी लवकरात लवकर माहिती भरून आपले अर्ज दाखल करावे. आणि या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तेजस सांगळे यांनी केले आहे. तसेच कागदपत्रं अपडेट करण्यासाठी पूर्वीपेक्षा कमी वेळ लागत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
फोटो माहिती सौजन्य : तेजस सांगळे, सामाजिक कार्यकर्ते
Already benefit taken this acount number. And this adhar number is already done asha error yet ahet.. so kas bharnar amhi form