कल्याण दि.25 जुलै :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळाजवळील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र सध्या बंद करण्यात आल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. तसेच नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत होईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Water treatment plant closed due to inflow of Ulhas River: Water supply to these areas including Kalyan West is stopped)
या भागांतील पाणी पुरवठा बंद…
जलशुद्धीकरण केंद्र बंद झाल्याने केडीएमसीच्या अ प्रभातगातील मांडा, टिटवाळा, उंबरणी , बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेकडील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.