ठाणे दि.25 जुलै :
काल रात्रीपासून ठाणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. परिणामी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने सखल भाग जलमय झाले आहेत.
गेल्या 24 तासांत ठाणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा विचार करता मुरबाड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर त्याखालोखाल ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची नोंद झाली आहे. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार करता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने गेल्या 24 तासांमध्ये 100 मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.
पावसाची आकडेवारी
ठाणे 144.6
कल्याण डोंबिवली 128.5
मुरबाड 212.8
भिवंडी 112.7
शहापूर 115.5
उल्हासनगर 115.8
अंबरनाथ 119