कल्याण दि.24 जुलै :
रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या अध्यक्षपदी रो. अरविंद शिंदे यांचा पदग्रहण समारंभ प्रांतपाल दिनेश मेहता आणि उपप्रांतपाल महेंद्र हिंगोरांनी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मावळत्या अध्यक्षा रो. डॉ. स्मिता तानखीवाले यांच्याकडून शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी क्लब सेक्रेटरी म्हणून रो. हिरामण क्षीरसागर आणि खजिनदारपदी रो. राहुल पेन्शनवार यांसह इतर क्लब डायरेक्टर यांनीही पदभार स्वीकारला. (Arvind Shinde as President of Rotary Club of Kalyan Diamond and Honorary membership accepted by Padmashri Dr. Prakash Baba Amte)
रो.अरविंद शिंदे यांचा शहरातील विविध सामाजिक संस्थांमध्ये सहभाग असून ते शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, विदर्भ सिटीझन फोरमचे संस्थापक, लॉ असोशिएशन चे संस्थापक सचिव , सुभेदारवाडा कट्टाचे संस्थापक सचिव आणि अखिल महाराष्ट्र भाट समाजाचे राज्य महासचिव आहेत. सतत नवनवीन सामाजिक संकल्पना राबविणारे अरविंद शिंदे हे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन – प्रशिक्षण देत असतात.
शिंदे फाउंडेशनचे माध्यमातून ते पर्यावरण आणि गरीब गरजू विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करीत असतात. सन 2021 ला रोटरीमध्ये आलेले अरविंद शिंदे यांनी मागील तीन वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. यात प्रमुख्याने असामान्य कार्य करणाऱ्या महिलांसाठी रोटरी जीवन गौरव पुरस्कार त्यांनी सुरु केले. आजच्या त्यांच्या पदग्रहणप्रसंगी शहरातील 9 प्रतिष्ठीत नागरिकांनी रोटरीचे सदस्यत्व स्वीकारले. याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध समुपदेशक-प्रशिक्षक डॉ. दिनेश गुप्ता यांनीही सदस्यत्व स्वीकारले .
रो. अरविंद शिंदे यांचे सामाजिक प्रेरणास्थान आणि जागतिक कीर्तीचे मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी ऑनलाईन पद्धतीने रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्सचे मानद सदस्यत्व स्वीकारले.या निमित्ताने 118 वर्षांपासून 200 हून अधिक देशात विस्तार झालेल्या रोटरीमध्ये सन्मानपूर्वक डॉ. आमटे यांचा प्रवेश झाला. त्यांचा रीतसर प्रत्यक्ष पदग्रहण लवकरच होईल असे क्लब प्रेसिडेंट रो. अरविंद शिंदे यांनी सांगितले.
ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेसिडेंट अरविंद शिंदे यांच्या भविष्यातील सामाजिक उपक्रमाचे नियोजन बघून शहरातील अक्षरमंच सामाजिक- संस्कृतिक प्रतिष्ठान , लाभ फॉउंडेशन, लीगल अवेअरनेस वेलफेअर असोशीएशन, योग संध्या योगा फिटनेस आणि आनंदी महिला मंच सारख्या सामाजिक संस्था पार्टनर संस्था म्हणून क्लबच्या सहयोगी संस्था म्हणून जोडल्या आहेत.
यावेळी बहुसंख्येने क्लब सदस्य , रोट्रॅक्ट व इनरव्हील सदस्या सह 2023-24 चे रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल रो. मिलिंद कुलकर्णी, आयएमए प्रेसिडेंट डॉ. सुरेखा इटकर , डॉ. प्रशांत पाटील, डॉ. महेश भिवंडीकर , कल्याण नागरिकचे संपादक मच्छिन्द्र कांबळे, डॉ. दीपक वझे सर्व को प्रेसिडेंट , रोटरी डिस्ट्रिक्ट टीम ऑफिसर्स आणि शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश जोशी यांनी केले.