कल्याण डोंबिवली दि.14 जुलै :
काल सकाळपासून कल्याण डोंबिवली आणि परिसराला पावसाने चांगले झोपून काढले असून गेल्या 24 तासात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तर आज सकाळपासून आहे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.(Kalyan Dombivli recorded 130 mm rainfall in last 24 hours)
ठाणे जिल्ह्याचा विचार करता भिवंडी तालुक्यामध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक म्हणजे जवळपास दीडशे मिलिमीटर (149.06) पाऊस झाला असून त्या खालोखाल शहापूर 147.6, मुरबाड – 139.3,ठाणे 134.6,कल्याण डोंबिवली 130, उल्हासनगर 119.08 आणि अंबरनाथ 108.09 मध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्हा पावसाची आकडेवारी
1.ठाणे – 134.6 mm
2.कल्याण – 130.0 mm
3.भिवंडी – 149.6 mm
4.अंबरनाथ – 108.9 mm
5.उल्हासनगर – 119.8 mm
6.मुरबाड – 139.3 mm
7.शहापुर – 147.6 mm
एकूण पाऊस – *135.5 mm*