ठाणे दि.8 जुलै :
हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी वर्तवलेल्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील 1 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना शिक्षण विभागातर्फे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Heavy rain warning: Holiday announced for schools in Thane district tomorrow (July 9, 2024).)
अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.