नवी दिल्ली दि.27 जून :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कल्याण शहर उपाध्यक्ष चेतन भंडारी यांनी नुकतीच पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आगामी काळातील आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी आपण या भेटीद्वारे शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रियाही चेतन भंडारी यांनी यावेळी दिली.