सामान्य नागरिकांसह राजकीय व्यक्तींकडून आर्थिक मदत
कल्याण दि.27 मे :
आपल्या समाजात संवेदना आणि माणूसकी अजूनही शिल्लक आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. एका दुर्दैवी घटनेत आपले दोन्ही पाय गमावलेल्या तरुणाला त्याच्या पायावर पुन्हा उभा करण्यासाठी अनेक दानशूर हात पुढे सरसावले आहेत.
जगन जांगळे असे या तरुणाचे नाव असून काही दिवसांपूर्वी ठाणे ते कळवा लोकल प्रवासादरम्यान त्याच्यावर काही टवाळखुरांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला होता. ज्यामध्ये लोकलमधून खाली पडल्याने आणि पायावरून लोकल गेल्याने जगनला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते.
त्यामध्ये लोकल न्यूज नेटवर्क म्हणजेच एलएनएननेही खारीचा वाटा उचलत जगनच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी आपल्या वाचकांना साद घातली होती. ज्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून दिसून येत आहे. एल एन एन च्या अनेक दर्शक आणि वाचकांनी त्यांच्या परीने जमली तेवढी अर्थिक मदत थेट जगन आणि त्याच्या कुटुंबियांच्या खात्यात जमा केली आहे.
त्यासोबतच कल्याण पूर्वेतील शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी जगनवर उपचार सुरू असलेल्या ठाण्यातील रुग्णालयाला भेट दिली. आणि तिथल्या प्रमुख डॉक्टरांशी चर्चा करून जगनवरील उपचार खर्च संपूर्ण मोफत करण्यासह त्याच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची आर्थिक मदतही केली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातूनही या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी महेश गायकवाड यांनी सांगितले आहे. माणुसकीच्या या झऱ्यामुळे आभाळाएवढ्या दुःखाशी लढण्याचे काही प्रमाणात का होईना मानसिक बळ जगनच्या कुटुंबीयांना प्राप्त झाले आहे.
त्याबद्दल लोकल न्यूज नेटवर्कच्या या मदतीच्या आवाहनाला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या सर्व संवेदनशील व्यक्ती आणि राजकीय पुढाऱ्यांचं मनापासून आभार. तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या माणूसकी आणि संवेदनशीलतेला त्रिवार वंदन…
अजूनही आपल्यापैकी कोणाला मदत करायची असल्यास आपण करू शकता…
Name- Mangesh Yashwant Jangale
Bank Name – State bank of india
Account no. 37297033737
IFSC – SBIN0012965
*गुगल पे क्रमांक*
मंगेश जंगले – 9768601156
तुषार जंगले -9653486856