भटके विमुक्त हक्क परिषद, डोंबिवली लोकसेवा समिती आणि महाराष्ट्र राज्य महिला बचत गट संघटनेने दिला जाहीर पाठिंबा!
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आभार
डोंबिवली दि18 मे :
कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना विविध संस्था, सामाजिक संघटना यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आज भटके विमुक्त हक्क परिषद, डोंबिवली लोकसेवा समिती आणि महाराष्ट्र राज्य महिला बचत गट संघटना या संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात केलेल्या विकासकामांचा चढता आलेख पाहून पाठिंबा देत असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे. याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या संस्थांचे आभार व्यक्त केले आहेत.
कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पायाभूत सुविधा देण्यासोबतच अनेक महत्त्वकांक्षी आणि गेमचेंजर प्रकल्प राबवले. त्यामुळे ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ अशी त्यांची ओळख बनली. त्यांनी केलेल्या याच विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत शेकडो सामाजिक संस्था, संघटना यांनी त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. आता भटके विमुक्त हक्क परिषद, डोंबिवली लोकसेवा समिती आणि महाराष्ट्र राज्य महिला बचत गट संघटना या संस्थांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या संस्था आणि संघटनांचे आभार व्यक्त केले आहेत.
याप्रसंगी भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे, कार्याध्यक्ष शंकर माटे, उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सचिव सखाराम धुमाळ, युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी, ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव इंगोले, डोंबिवली लोकसेवा समितीचे अध्यक्ष रामचंद्र परब, महाराष्ट्र राज्य महिला बचत गट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस.बी. होळकर यांच्यासह सामाजिक संस्था आणि संघटनांचे अनेक सदस्य उपस्थित होते.