भिवंडी दि.9 मे :
भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदार नाव नोंदणीसाठी 23 एप्रिलपर्यंत वेळ वाढवून दिल्याने या संधीचा फायदा घेत या 3 महिन्यांच्या काळात 78 हजार 859 मतदारांनी नाव नोंदणी केली. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या आता 20 लाख 87 हजार 244 इतकी झाल्याची माहिती 23, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.(Bhiwandi Lok Sabha: Increase of 78 thousand 859 voters in last 3 months, total voters over 20 lakh 87 thousand)
असे वाढले आहेत मतदार…
134 भिवंडी ग्रामीण…8 हजार 755 वाढ
135 शहापूर …4 हजार 391 वाढ
136. भिवंडी पश्चिम…12 हजार 838
137 भिवंडी पूर्व…18 हजार 764 वाढ
138 कल्याण 22 हजार 756 वाढ
139 मुरबाड 11 हजार 233
23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार भिवंडी लोकसभेत 20 लाख 8 हजार 521 इतके मतदार होते. त्यानंतर 23 एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करण्यात आली. ज्यामध्ये तब्बल 78 हजार 859 नव मतदारांची नोंदणी झाली. ज्यामध्ये कल्याण पश्चिमेत सर्वाधिक 22 हजार त्याखालोखाल भिवंडी पूर्वमध्ये 18 हजार 764, भिवंडी पश्चिममध्ये 12 हजार 838 आणि मुरबाडमध्ये 11 हजार 233 मतदार वाढले आहेत.
ज्यातही मुरबाड विधानसभा मतदासंघात सर्वाधिक 4 लाख 42 हजार 922 तर शहापूरमध्ये सर्वात कमी म्हणजेच 2 लाख 79 हजार 137 मतदार आहेत. त्यामुळे या नव्याने वाढलेल्या मतदार संख्येनुसार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांची विधानसभा मतदारसंघनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
भिवंडी ग्रामीणमध्ये 3 लाख 23 हजार 977 मतदार,
शहापूरमध्ये 2 लाख 79 हजार 137,
भिवंडी पश्चिममध्ये 3 लाख 4 हजार 859,
भिवंडी पूर्वमध्ये 3 लाख 36 हजार 110,
कल्याण पश्चिममध्ये 4 लाख 138
मुरबाडमध्ये 4 लाख 42 हजार 922 मतदारांची संख्या झाली आहे.
ज्यामध्ये पुरुष मतदार हे 11 लाख 29 हजार 714, स्त्री मतदार हे 9 लाख 57 हजार 191 तर 339 तृतीय पंथीय मतदार असे मिळून मतदारांची संख्या 20 लाख 87 हजार 244 झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.