ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश
ठाणे दि .30 एप्रिल :
एकीकडे कल्याण लोकसभेतील महविकास आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे आज डोंबिवलीत येऊन गेल्याला काही तासही उलटत नाहीत तोच कल्याण लोकसभेत उध्दव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
उध्दव ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड आणि कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम (काला) चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.(Uddhav Thackeray group has a big gap in Kalyan Lok Sabha; Former corporators, women district organizers join Shiv Sena along with city chiefs)
कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात झालेल्या विकासाने प्रभावित होऊन विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय आपण घेतला असून ज्याठिकाणी आपल्या कामाची किंमत होते, तिथे आपण आल्याची प्रतिक्रिया यावेळी विवेक खामकर यांनी दिली.
कल्याण लोकसभेत एकीकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात केलेल्या विक्रमी विकासकामांचे सादरीकरण जनतेसमोर ठेवत जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे आजच उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे हे डोंबिवलीत आले होते. त्यांच्या दौऱ्याला काही तास उलटत नाहीत, तोच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उलटली आहे.
या पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश –
उध्दव ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, युवती जिल्हा अधिकारी लीना शिर्के, जिल्हा संघटक कविता गावंड, विधानसभा संघटक राधिका गुप्ते, शहर संघटक किरण मोंडकर, माजी नगरसेवक पुरुषोत्तम (काला) चव्हाण, उपशहरप्रमुख राजेंद्र नांदोस्कर, कृष्णा आव्हाड, महिला उपशहर संघटक नंदा सावंत, शिल्पा मोरे, अल्पा चव्हाण, सीमा अय्यर, विद्या देसाई, विभाग प्रमुख श्याम चौगुले, सुधीर पवार, शिवराम हळदणकर, महिला विभाग संघटक मानसी गावडे, प्रतिभा पांचाळ, नीलम मांजरेकर, मंदा भोईर, मीना गवारे, भावना चव्हाण, प्राजक्ता दळवी, संजना राणे, उपविभाग प्रमुख गोरक्ष खोकराळे, नरेंद्र खाडे, सतीश कुलकर्णी, प्रशांत शिंदे, महिला उपविभाग संघटक स्मिता मोहिते, अपर्णा खेडेकर, सोनल कदम, रसिका तांडेल, अनिता पडवळ, भावना पेडणेकर, सविता नलावडे, लीना तेंडुलकर, शामल आचरेकर, शाखाप्रमुख प्रसाद चव्हाण, विष्णू पवार, मयूर जाधव, महिला शाखा संघटक सरिता जाधव, नमिता मयेकर, भवती घरत, पुनम खंदारे, श्रद्धा रहाटे, आकांक्षा साहिल, अश्विनी शिंदे, अनुजा सावंत, वर्षा नलावडे, प्रतीक्षा सीतकर, ज्योती विश्वकर्मा रत्ना चक्रवर्ती किरण शिंदे, उपशाखाप्रमुख नितीन खिल्लारे, महिला उपशाखा संघटक दिपाली कानडे, प्रणाली साटम, भारती पितळे, सरस्वती प्रधान, युवासेना उपशहर अधिकारी आयुष गावंड, उपविभाग अधिकारी तेजस वैद्य, साहिल कुडपाने, साहिल परब, प्रकाश भालेराव, सागर कसबे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.