कल्याण दि.12 एप्रिल :
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाद्वारे नववर्ष स्वागत यात्रेत कान्हदेश चित्ररथ सहभागी करून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कल्याण नववर्ष स्वागत यात्रेच हे २५ वें रौप्य महोत्सवी वर्ष होत. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि कल्याण सांस्कृतिक मंच दरवर्षी कल्याण शहरात नववर्ष स्वागत यात्रेचा आयोजन करत असतात. यावर्षी त्यांनी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाला सहभागी होण्याची आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आपला कान्हदेश चित्ररथ तयार केला.या चित्ररथात खान्देशातील महापुरुषांचे माहिती आणि त्यांची वेशभूषा केलेली पात्र सहभागी करण्यात आली होती.
आदिवासी स्वातंत्र्यवीर इतिहासाच्या पानातील दुर्लक्षित स्वातंत्र्य योद्धा वीर ख्वाजा नाईक (श्री अहिरे) शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या कार्याला दिशा देणारे महाराजा सयाजीराव गायकवाड, (अनिरुद्ध चव्हाण), भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान देणारे साने गुरुजींचे ( श्री राजेंद्र गोसावी), येरवडा जेल तोडून त्याकाळी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील ( सौ वैशाली पाटील), कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचा (सौ आशा भामरे ), तर मेरी झाशी नही दूंगी म्हणत ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारी महान विरांगाना झाशीची राणी (मोनिका पाटील), गोळी चालवायची तर सर्वात आधी माझ्यावर चालवा असं म्हणत स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणारे( शिरीष कुमार )लक्ष्मीकांत पाटील यांनी करून एक सुंदर संकल्पना या स्वागतयात्रेत सहभागी करण्यात आली. तसंच या चित्ररथाला आपल्या सांस्कृतिक समितीतील गायकानी बहिणाबाईंच्या कविता, साने गुरुजींचे देशभक्तीपर गीत यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. सुमधुर गायक सुनीता बोरसे ,आशा वाडीले ,योगिता सोनवणे ,हेमलता देसले, चेतना भालेराव ,प्राध्यापक प्रकाश माळी ,रवींद्र शिंपी ,रतिलाल कोळी ,श्रीरंग अत्रे यांनी कार्यक्रमात बहार आणला.
तर या कार्यक्रमाचे नियोजनासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, कोषाध्यक्ष अर्जुन पाटील, महिला आघाडी सचिव वर्षा पाटील, सुधाकर भामरे ,विनोद शेलकर, सुनील इंगळे ,मिलिंद बागुल, विनायक संन्यासी ,सुभाष सरोदे, संजय बिलाले, कमल पाटील जी आर पाटील शोभा पाटील, प्रांतिक तेली समाजाचे प्रदेश सचिव सुनील चौधरी, भूषण चौधरी ,धनगर समाजाचे देवराम कनखरे ,भोई समाजाचे एम बी भोये तसेच विविध समाज प्रतिनिधी सहभागी झाले होते तसेच इंदाला ग्रुपने सुद्धा आपला शैक्षणिक समूहासोबत या यात्रेत खान्देश विकास मंडळा सोबत सहभागी झाले इंदाला ग्रुपचे चेअरमन डॉक्टर विजय महाजन, प्राचार्य श्री भारंबे सर ,प्राध्यापिका निकिता कोल्हे मॅडम तसेच अनेक सहकारीया यात्रेत सहभागी झाले होते.