Home ठळक बातम्या महाराष्ट्रात या 5 टप्प्यात होणार मतदान ; पाहा आपल्याकडे कधी आहे मतदान

महाराष्ट्रात या 5 टप्प्यात होणार मतदान ; पाहा आपल्याकडे कधी आहे मतदान

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली दि.16 मार्च :
अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आणि संपूर्ण देशभरात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशामध्ये गेल्या वेळेप्रमाणे 7 टप्प्यामध्ये हे मतदान घेण्यात येणार असून सगळीकडे मतमोजणी मात्र एकाच दिवशी केली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात होणार 5 टप्प्यात मतदान …
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. ज्याचा पहिला टप्पा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी, दुसरा टप्पा – 26 एप्रिल, तिसरा टप्पा – 7 मे , चौथा टप्पा – 13 मे आणि
पाचवा टप्पा – 20 मे रोजी असणार आहे. या प्रत्येक टप्प्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे.

यादिवशी याठिकाणी होणार मतदान…

1ल्या टप्प्यात म्हणजेच 19 एप्रिला रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर असे 5 लोकसभा मतदारसंघात…

2ऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिलला
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी अशा एकूण 8 लोकसभा मतदारसंघात…

3ऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये…

4थ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड अशा एकूण 11 मतदारसंघामध्ये…

आणि

5 व्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर अशा एकूण 13 मतदारसंघामध्ये मतदान घेण्यात येणार आहे.

तर या सर्व लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण देशभरात एकाच दिवशी म्हणजेच 4 जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा