वाहतूक पोलिसांनी काढली अधिसूचना
कल्याण दि.4 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे कल्याण स्टेशनच्या पश्चिम परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरु आहे. तसेच कल्याण स्टेशनसमोरील एस टी आगाराच्या पुनर्विकासाचे कामही केले जात आहेत. या दोन्ही कामांच्या पार्श्वभूमीवर स्टेशन परिसरातील काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. त्याबाबत वाहतूक पोलिसांनी नुकतीच अधिसूचना काढली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वल्लीपीर चौक ते महात्मा फुले चौका दरम्यान उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. तसेच एसटी डेपोच्या इमारतीचा पुनर्विकास करून त्याठिकाणी बहुमजली इमारत उभारून ती उड्डाणपुलाला जोडण्यात येणार आहे. कल्याण स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीतील हे बदल लागू राहणार असल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
याठिकाणी असणार प्रवेश बंद…1
छत्रपती शिवाजी महाराज चौक पुष्कराज हॉटेल (मोहंमद अली चौक) दिपक हॉटेल दरम्यान ( वन वे ) एक दिशा मार्ग करण्यात येत आहे दिपक हॉटेल येथून पुष्कराज हॉटेल ( मोहंमद अली चौक) मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिपक हॉटेल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
त्याला पर्यायी मार्ग हा…
सदरची वाहने दिपक हॉटेल एस टी. स्टेंड इनगेट ते गुरूदेव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील.
याठिकाणी असणार प्रवेश बंद…2
छत्रपती शिवाजी महाराज चौक पुष्कराज हॉटेल (मोहंमद अली चौक) महात्मा फुले चौक दरम्यान(वन वे) एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. महात्मा फुले चौक कडून पुष्कराज हटिल (मोहमद अली चौक) मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौककडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना महात्मा फुले चौक येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे.
त्याला पर्यायी मार्ग हा…
सदची वाहने महात्मा फुले चौक दिपक हटिल एस टी स्टैंड इनगेट ते गुरूदेव हटिल मार्गे इच्छित स्थळी जातील.
याठिकाणी असणार प्रवेश बंद…3
एसटी स्टैंड इनगेट ते झुंजारराव मार्केट ते गुरूदेव हॉटेल दरम्यान ( वन वे) एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. गुरूदेव हॉटेलकडून कल्याण स्टेशनकडे व झुंजारराव मार्केटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गुरूदेव हॉटेल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
त्याला पर्यायी मार्ग हा…
ही वाहने गुरूदेव हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज चौक पुष्कराज हॉटेल (मोहंमद अली चौक ) मार्गे मार्गे इच्छित स्थळी जातील अथवा झुंजारराव मार्केट येथे जाणारी वाहने डि मार्ट आर्चीज गॅलरीगल्ली मार्गे इच्छीत स्थळी जातील.
याठिकाणी असणार प्रवेश बंद…4
आर्चीज गॅलरी – साधना हॉटेल नाना नानी पार्क (मागील बाजू) ते टेनिस कोर्ट (केडीएमसी) दरम्यान ( वन वे) एक दिशा मार्ग करण्यात येत आहे. टेनिस कोर्टकडुन साधना हॉटेलकडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना टेनिस कोर्ट येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
याला पर्यायी मार्ग हा…
सदरची वाहने कराची मेडिकल आर्चिज गॅलरी गल्ली मार्गे इच्छित स्थळी जातील, महात्मा फुले चौक ते दिपक हॉटेल हा एकदिशामार्ग रद्द करून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येत आहे.
याठिकाणी असणार प्रवेश बंद -5
सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना सुभाष चौक येथून कल्याण स्टेशनकडे जाण्यासाठी सुभाष चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच कल्याण स्टेशनकडे जाणा-या सर्व प्रकारच्या खासगी बसेसना महात्मा फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
याला पर्यायी मार्ग हा…
सुभाष चौक येथून कल्याण स्टेशनकडे जाणारी जड अवजड वाहने ही प्रेम ऑटो सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जातील, तसेच सर्व खासगी बसेस या महात्मा फुले चौक येथे यु टर्न घेवून सुभाष चौकमार्गे इच्छीत स्थळी जातील.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर,ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.