कल्याण दि. 30 ऑक्टोबर :
केवळ कल्याण डोंबिवलीमध्ये नाही तर ठाणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कल्याणातील आयामेथॉन स्पर्धेने नावलौकिक मिळवला आहे. यंदाच्या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून त्याच्या टी शर्ट आणि ट्रॉफीचे रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत लॉन्चिंग करण्यात आले. (Launching of iMethon 4 t-shirts and trophies in presence of dignitaries)
इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे अतिशय शिस्तबद्ध, सुनियोजित आणि दिमाखदाररित्या या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. अवघ्या तीन वर्षांतच या स्पर्धेने दिग्गज धावपटूंच्या मनामध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये तब्बल तीन हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी करत नवा विक्रम रचला होता. यंदा आयमेथॉनचे चौथे वर्ष असून या स्पर्धेसाठी नाव नोंदणीही जोरदार सुरू झाली आहे. 17 डिसेंबर 2023 ला यंदाची स्पर्धा होणार आहे.
दरम्यान जगभरातील धावण्याच्या शर्यतीत विक्रम घडवणाऱ्या दिग्गज धावपटूंच्या उपस्थितीत रविवारी यंदाच्या स्पर्धेतील टी शर्ट आणि ट्रॉफी लॉन्चचा सोहळा पार पडला. ज्याला जागतिक, राष्ट्रीय आणि विविध नामांकित स्पर्धा गाजवणारे अनेक धावपटूही उपस्थित होते. ज्यामध्ये डॉ. वैजयंती, डॉ. शर्मिला पांडे, बर्लिन स्पर्धेत नऊवारी साडी नेसून गिनीज बुकमध्ये नाव नोंद झालेल्या क्रांती साळवी, आशीष कासवलेकर, केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कल्याण रनर्स ग्रुपचे समीर पाटील, सचिन सालियन यांच्यासह आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ ईशा पानसरे, डॉ. सुरेखा इटकर, डॉ. विकास सूरंजे, डॉ. हिमांशु ठक्कर, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. राजेश राघव राजूआदी मान्यवर उपस्थित होते.