Home ठळक बातम्या घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला ; मेट्रो मॉलसमोरील रस्त्यावर झाला...

घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला ; मेट्रो मॉलसमोरील रस्त्यावर झाला अपघात

 

कल्याण दि.28 जुलै :
घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटून अपघात झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉलजवळ घडली. या अपघातामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

आज पहाटे साधारणपणे पाच वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉलसमोर असणाऱ्या केडीएमसी उर्दू शाळेसमोर हा अपघात घडला. सूचक नाक्याकडून हा घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक कल्याणकडे येत होता.

मेट्रो मॉलसमोरून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक डिव्हायडरला धडकून उलटला. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये असणारे सर्व गॅस सिलेंडर हे भरलेले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर ट्रक उलटल्यानंतर काही गॅस सिलेंडर रस्त्यावर पसरल्याने याठिकाणी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

दरम्यान कोळसेवाडी ट्रॅफिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या ट्रकमध्ये असणारे भरलेले गॅस सिलेंडर रस्त्याच्या एका बाजूला गोळा करून ठेवले. आणि क्रेन मागवून तातडीने हा ट्रक रस्त्यावरून बाजूला केल्याची माहिती स्थानिकांनी एलएनएनला दिली.

फोटो सौजन्य: गिरीश पाटील, एलएनएन सिटीजन रिपोर्टर

व्हिडिओ माहिती सौजन्य : संजीव चौधरी, स्थानिक रहिवासी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा