कल्याण दि. 6 जुलै :
देशातील बहुप्रतिक्षित आणि सामान्य व्यक्तीच्या आवाक्यातील स्मार्टफोन असणारा रिलायन्स इंडस्ट्रीजचा, जिओ भारत 4 जी फोन आता कल्याणातही मिळणार आहे. फक्त 999 रुपये किंमत असणाऱ्या या 4 जी स्मार्ट फोनचे केडीएमसीचे ब्रँड अँबेसेडर डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते आज कल्याणात लाँचिंग करण्यात आले.
रिलायंसचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या आज असलेल्या पुण्यतिथीचे तसेच संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून कल्याणातील जिओ कार्यालयात हा लाँचिंगचा सोहळा संपन्न झाला. कल्याणात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या जितेंद्र कुमार यांना सर्वात पहिला हँडसेट मान्यवरांच्या हस्ते मोफत देण्यात आला. या फोनमध्ये असणाऱ्या फिचर्समुळे 2 जी फोन वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील असा विश्वास यावेळी डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे भारताला 2G मुक्त करण्याचे लक्ष्य असून देशातील प्रत्येक ग्राहकाच्या हातात 4G फोन असावा हे त्यांचे स्वप्न आहे. ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी ‘जिओ भारत’ प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या एक भाग म्हणून, कंपनीने केवळ 999 रुपयांत हा 4G फोन लाँच केला आहे.
दरम्यान आता देशाच्या प्रमूख शहरांप्रमाणे कल्याणातही हा सर्वात स्वस्त 4 जी फोन मिळणार आहे. कल्याणात झालेल्या या सोहळ्यामध्ये कल्याण सिटी आणि ह्युमन ऑफ कल्याण फेसबुक पेजचे प्रमूख अब्बास पॉकेटवाला, कुणाल यादव यांच्यासह रिलायन्स जियो कल्याणचे प्रमुख हेमंत भयानी आणि विविध अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.