कल्याण डोंबिवली दि.२९ जून :
परवा रात्रीपासून मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली सह ठाणे जिल्ह्याला अक्षरशा झोपून काढले आहे 24 तासातील पावसाच्या आकडेवारीवर नजर फिरवल्यास याचा आपल्याला प्रत्यय येऊ शकतो. कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १३५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.(LNN)
जून महिना संपला आला तरी दडी मारून बसलेला वरून राजा तीन-चार दिवसांपूर्वी अचानक अवतरला. कालपासून तर पावसाने कल्याण डोंबिवली भिवंडी अंबरनाथ ठाणे आदी शहरांना झोडपून काढले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत ठीक ठिकाणी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच्या घटना घडल्या. दरम्यान दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साचलेले पाणी पाण्याचा निचरा होण्यास काही प्रमाणात मदत झाली. मात्र वरुणराजाने आज सकाळीही कालचाच कित्ता गिरवत जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे कालच्या प्रमाणेच सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.(LNN)
गेल्या २४ तासांत झालेला पाऊस…
कल्याण डोंबिवली – १३६.५
ठाणे – १४३.९
मुरबाड – ५२.० (LNN)
भिवंडी – १५५.९
शहापूर – ११४
उल्हासनगर – १२६.५
अंबरनाथ – १४६.६