Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परीसरात भंगार दुकानाला भीषण आग

कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परीसरात भंगार दुकानाला भीषण आग

 

कल्याण दि.११ जून :
कल्याण पूर्वेत एका भंगाराच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये हे भंगाराचे दुकान जळून खाक झाले असून आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात हे भंगाराचे दुकान आहे. विशेष म्हणजे नागरी वस्तीच्या मधोमध हे दुकान असल्याने आगीमुळे स्थानिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दिड तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा