Home ठळक बातम्या कल्याणात सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे इमारतीवरील पत्र्याचा सांगाडा कोसळला गाड्यांवर

कल्याणात सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे इमारतीवरील पत्र्याचा सांगाडा कोसळला गाड्यांवर

 

कल्याण दि.१० जून :
आज दुपारपासून कल्याण डोंबिवली परिसरात सोसाट्याचे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे एका इमारतीवरील लोखंडी पत्रे आणि त्याचा भलामोठा सांगाडा गाड्यांवर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी गाड्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ( Cyclone bijoypar – In Kalyan, due to gusty winds, the sheet skeleton of the building collapsed on the cars)

कल्याण पश्चिमेच्या लालचौकीजवळील सुभाष नगर परिसरात तिर्थधाम कॉम्प्लेक्समध्ये आज संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. दुपारपासून सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेजारच्या इमारतीवरील पत्रे आणि त्याचा लोखंडी सांगाडा उडून थेट विघ्नहर टॉवरसमोर पार्क केलेल्या गाड्यांवर येऊन पडला. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र याठिकाणी उभ्या असणाऱ्या दुचाकी आणि एका चार चाकीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आपल्याकडे वाऱ्याचा वेग वाढला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फोटो आणि माहिती सौजन्य : स्वानंद गोगटे, एल एन एन सिटीजन रिपोर्टर

In Kalyan, due to gusty winds, the sheet skeleton of the building collapsed on the cars

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा