Home ठळक बातम्या हजारो सदनिकाधारकांना पाणी टंचाईची झळ ; आमदार राजू पाटील यांनी घेतली भेट

हजारो सदनिकाधारकांना पाणी टंचाईची झळ ; आमदार राजू पाटील यांनी घेतली भेट

 

कल्याण ग्रामीण दि.५ जून :
एमआयडीसीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दावडी भागातील नामांकित गृहसंकुलाला मंजूर पाण्याचा कोटा मिळत नसल्याने हजारो सदनिकाधारकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी इथल्या रहिवाशांची भेट घेत समस्या जाणून घेतली. तसेच या प्रश्नाबाबत तातडीने एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात भलामोठ्या अनेक गृहसंकुलांची कामे जोरात सुरू आहेत. मात्र या बांधकामांना परवानगी देताना संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केली जात नाही. परिणामी गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथे उभारण्यात आलेल्या रिजन्सी अनंतममधील ७ हजार सदनिका धारकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा कोटा मंजूर असतानाही या हजारो सदनिकाधारकांचा घसा कोरडाच राहिला आहे.

यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी रविवारी रिजन्सी अनंतममधील रहिवाशांची भेट घेत समस्या जाणून घेतली. तसेच केडीएमसी, एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत तातडीने बैठक घेऊन ही पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी दिले आहे.

यावेळी मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, उपाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, सुनील राणे, संजय चव्हाण यांसह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा