डोंबिवली दि.१६ मे :
सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जात असून त्यांनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला पुरेपूर न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल. तसेच या नव्या पदाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया युवासेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. युवासेना प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात मोठ्या स्तरावर सामाजिक काम केले जात आहे. आपण कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करत असून पदासाठी कोणतीही मागणी केली नव्हती. परंतू आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेत त्यांनी युवासेना महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपवल्याचे दिपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
या पदाच्या माध्यमांतून आपण महाराष्ट्रातील तरुणांचे असणारे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करू. सर्व सामान्यांचा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आपल्या पाठीशी उभे असल्याने आपल्याला आव्हानात्मक वाटत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान डोंबिवली शिवसेना शाखेतर्फे झालेल्या सत्कार सोहळ्याला शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, बंडू पाटील, महिला आघाडीच्या लता ताई, प्रकाश माने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.