Home ठळक बातम्या कल्याणात सुरू झालेय देशातील पहिलेच असे कॉलेज…. नामांकित पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचा...

कल्याणात सुरू झालेय देशातील पहिलेच असे कॉलेज…. नामांकित पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचा पुढाकार

कल्याण दि. 6 एप्रिल :

कॉलेज किंवा महाविद्यालय…विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक असा महत्वाचा टप्पा, जिथे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात पाहिलेल्या स्वप्नांना पंख आणि बळ मिळण्याची आशा असते. मात्र गेल्या काही वर्षांतील आपल्या शिक्षण व्यवस्थेची वाटचाल पाहिल्यास दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे जळजळीत वास्तव आहे. मात्र विद्यार्थ्यांची नेमकी हीच गरज ओळखून शिक्षण क्षेत्रातील नामांकित अशा पोटे यांनी ऑफ एज्युकेशनने आपल्या संस्कृतीतील गुरुकुल शिक्षण पद्धतीवर आधारित अशा “अस्पायरंट कॉलेजची ” स्थापना केली आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार शिक्षणच नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याची माहिती पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सीएमडी बिपिन पोटे यांनी दिली.

जागतिक स्पर्धेच्या युगात वस्तुनिष्ठ शिक्षण ही काळाची गरज…
सध्याच्या काळात इतक्या झपाट्याने बदल होत आहेत की केवळ पुस्तकी ज्ञान आणि शिक्षण देऊन काहीही उपयोग नाही. प्रचंड वेगाने होणारे जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नोकरी व्यवसायांमध्ये आज जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये केवळ टिकून नाही तर अग्रेसर राहण्यासाठी भविष्यातील संधींचा वेध घेऊन दिले जाणारे वस्तुनिष्ठ शिक्षण ही काळाची गरज बनल्याचे बिपिन पोटे यांनी सांगितले. परंतू आपल्याकडील शिक्षण क्षेत्र हे विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने तयार करण्यात कमी पडत असून शिक्षण क्षेत्रातील ही पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने आम्ही अस्पायरंट अकादमीची सुरुवात केल्याचे ते म्हणाले.

११वी आणि १२वीचे असे कॉलेज जिथे सगळ्या करिअरची माहिती मिळेल…
कॉलेज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो प्रशस्त परिसर, भलीमोठी इमारत, त्यातील मोठाल्या क्लास रूम आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा. मात्र एवढे सगळे असूनही भविष्यातील गरज ओळखून आज आपल्याकडे मुलांच्या करिअरची अजिबात पायाभरणी होत नाही. आणि याच पार्श्वभमीवर आम्ही अकरावी आणि बारावीचे एक असे कॉलेज सुरू केलेय जिथे मुलांना ते शिक्षण घेत असणाऱ्या क्षेत्रातील सगळ्याच करिअरबाबत मार्गदर्शन उपलब्ध होईल.

 

अस्पायरंट कॉलेजची सुरुवात सायन्सपासून…
नव्या युगाचे दिशादर्शक असणाऱ्या या कॉलेजची सुरुवात सायन्स शाखेपासून करण्यात आली आहे. जिथे सायन्स रीलेटेड नीट आणि जेई परीक्षांची बॅच वेगळी आहे. नीट आणि जे ई परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याकडील विद्यार्थी हे लातूर आणि नांदेडला जात असतात. मात्र तिथलेच फॅकल्टी तिथलाच कंटेंट आम्ही याठिकाणी उपलब्ध करून दिल्याचे बिपिन पोटे यांनी सांगितले. त्यासोबतच या कॉलेजमध्ये डे बोर्डिंग सुविधा असून सकाळी ८ ते रात्री पर्यंत ८ मुलं थांबून त्यांच्या कोर्सची तयारी करू शकतात.

करिअरबाबत आवश्यक ती सगळी मदत आणि मार्गदर्शनही…
त्याव्यतिरिक्त विशेष म्हणजे कॉलेजमध्ये एनडीए, नाटासह सायन्सशी संबंधित कोणत्याही स्पर्धा परीक्षांचे कोर्स करता येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ११वी आणि १२वी या दोन वर्षात करिअरबाबत आवश्यक ती सगळी मदत आणि मार्गदर्शनही केले जाणार आहे.

तर ११वी आणि १२वी च्या स्पर्धात्मक परीक्षाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, आर्थिक साक्षरता, उद्योजकता, माईंडसेट, कोडींग, कम्युनिकेशन स्किल्स आदी सगळ्याच महत्वाच्या गोष्टींवरही या कॉलेजच्या माध्यमातून केले जाणार आहे. विद्यार्थ्यासाठी अशा प्रकारे काम करणारे हे कॉलेज कल्याण आणि महाराष्ट्र नव्हेच तर देशातील पहिलेच कॉलेज असल्याचा विश्वास बिपिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला. आहे.

लवकरच आर्टस् आणि कॉमर्सही सुरू होणार…
सध्या अस्पायरंट कॉलेजमध्ये सायन्स शाळेच्या सगळ्या करिअरबाबत शिकवण्याची सुविधा असली तरी येत्या काळात आर्टस् आणि कॉमर्ससाठीही आम्ही अशाच प्रकारे वर्ग सुरू करणार असल्याची महत्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या कॉलेजची एकंदर शिक्षण पध्दती पाहता आपल्या शिक्षण व्यवस्थेतील कमी भरून निघण्यासह शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते पंख आणि बळ नक्कीच प्राप्त होणार आहेत. ज्याच्या आधारे मग हा विद्यार्थी उज्वल प्रगतीच्या दिशेने झेप घेण्यास सज्ज होईल.

कॉलेजमध्ये ॲडमिशन किंवा अधिक माहितीसाठी संपर्क :

अस्पायरंट अकॅडमी – 8928159116

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा