मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी दिली महत्वाची माहिती
डोंबिवली दि.16 मार्च :
देशातील कोट्यवधी भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (ayodhya Shriram mandir) कामाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या मंदिराचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल अशी माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी डोंबिवलीत दिली. (70 percent completion of Shri Ram Temple in Ayodhya; Pran Pratistha will be held in January 2024)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार सोहळा…
राम मंदिराचे काम सध्या वेगात सुरू आहे. जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात राम लल्लांची त्यांच्या मूळ जागेवर स्थापना करण्यात येईल आणि ही स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार असल्याचे सुतोवा गोविंद देवगिरी महाराज यांनी केले.
लोकसभा निवडणुका राममंदिर बांधणीचा संबंध नाही…
लोकसभेच्या निवडणुका (Loksabha elections) जवळ आल्याने काम वेगात सुरू असल्याचा आरोप चुकीचा आहे. लोकसभा निवडणुका आणि राम मंदिर बांधणीचा काही संबंध नसून आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीरामांना लवकरात लवकर मूळस्थानी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील…
तर भगवान रामलल्लानी खूप दिवस कपड्यांच्या मंडपात काढले. सध्या छोट्या स्वरूपातील मंदिरामध्ये ते असून त्यांना लवकरात लवकर मूळ स्थानी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. तर देशातील वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या सर्वच धार्मिक हिंदू स्थळांचा पुनरुद्धार होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी श्रीमलंगगड (Shri Malangagad) प्रकरणी व्यक्त केले.
भारत हा पुनरुत्थाननाच्या मार्गावर…
डोंबिवलीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात झाली. भारत हा पुनरुत्थाननाच्या मार्गावर चालत आहे. त्याचा आरंभ झाला आहे. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता झोळी घेऊन फिरणारा देश राहिलेला नाही तर जगाला व्हॅक्सिन (vaccine country) वाटणारा देश झालो आहोत. बदललेली ही प्रतिमा दाखवून देत आहे की भारताची प्रगती होत आहे. सर्व जगात योग पोहोचला, आयुर्वेद पोहोचला आणि भारतीय संगीत देखील पोहचले. हीच सांस्कृतिक क्रांती सर्व जगाला व्यापून टाकेल असा माझा विश्वास असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.