कल्याण दि.10 मार्च :
आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ला गेल्या आठवड्यात सतत तीन वेळा आग लागल्याची घटना घडल्यानंतर हे आगीचे लोन आता बारावे डम्पिंग ग्राउंड कडे सरकले आहे. बारावी येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर असणाऱ्या कचऱ्याच्या भल्या मोठ्या निघाला आज पहाटे आग लागली. त्यामुळे कचऱ्याच्या आगीतून पुन्हा एकदा संशयाचा दाट धूर निघत आहे.
अग्निशमन दलाकडून पहाटेपासूनच शर्थीचे प्रयत्न…
बारवे गावात कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणी कचऱ्याचा भला मोठा ढीग असून त्याला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण करत मोठ्या प्रमाणावर कचरा गिळंकृत केला. दरम्यान या आगीच्या घटनेमुळे बारावें, गांधारी आणि आसपासच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या सहा गाड्या पहाटेपासूनच या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.
ही आग लागण्या मागेही काळे बेरं…?
मात्र गेल्या आठवड्यात आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला सतत तीन वेळा मोठी आग लागली होती. परंतु ही आग लागली नसून कुणीतरी लावली असल्याचा दाट संशय व्यक्त होत होता. त्याचप्रमाणे आता बारावे येथील ही भीषण आगही लागलेली नसून ती लावली असावी असेच चित्र सद्य परिस्थितीवरून दिसत आहे.
महापालिका गांभिर्याने शोध घेणार का?…
काही वर्षांपूर्वी डंपिंगवरील आग लागल्याची घटना ही महासभेत चांगलीच गाजली होती. त्यावेळी महापालिका प्रशासनाने पुराव्यांसह डम्पिंग ग्राउंड वरची आग लागली नाही तर लावली जात असल्याचे सादर केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व घटनांकडे कल्याण डोंबिवली महापालिका गांभीर्याने लक्ष देऊन डंपिंग ग्राउंडला सतत ही आग नेमकी कशी लागतेय याचा शोध घेणार का ? हा खरा प्रश्न आहे.