Home ठळक बातम्या रंगपंचमीपूर्वीच धुळवड : का आले कल्याण डोंबिवलीत धुळीचे वादळ ?

रंगपंचमीपूर्वीच धुळवड : का आले कल्याण डोंबिवलीत धुळीचे वादळ ?

कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता बिघडली

कल्याण डोंबिवली दि. 6 मार्च :
आज एकीकडे सर्वत्र होळीचा मोठा उत्साह असताना कल्याण डोंबिवली परिसरात मात्र होळी पेटण्यापूर्वीच धुळवड साजरी होत आहे. मात्र ही धुळवड कुणा व्यक्तींची नसून निसर्गामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे कल्याण डोंबिवलीत सर्वत्र धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. (Dhulwad before Rangpanchami: Why did the dust storm come in Kalyan Dombivli?)

रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेमध्ये…

4 मार्च ते सहा मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे. तो सद्य परिस्थिती पाहता खरा होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली असून मुंबई सह ठाणे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यातच आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहर काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती. जोरदार वाऱ्यांमुळे या दोन्ही शहरात रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्य मानता कमी झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते.

 

शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावली…
दरम्यान शहरावर पसरलेल्या या धुळी धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचे एक क्यू आय इंडेक्सवरून दिसून आले. कल्याण डोंबिवली परिसरात आज तब्बल 233 इतका ए क्यू आय निर्देशांक नोंदवण्यात आला. परिणामी श्वसन आजार असणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झाला.

काही वर्षांपूर्वी आलेल्या धुळीच्या वादळाची आठवण

तर रंगपंचमीपूर्वीच निसर्गाने खेळलेल्या या धुळवडीने काही वर्षांपूर्वी आलेल्या धुळीच्या वादळाची आठवण करून दिली. मध्यपूर्व उपखंडात असणाऱ्या वाळवंटात आलेल्या भल्या मोठ्या वादळाचे परिणाम मुंबई आणि कोकण परिसराला काही वर्षांपूर्वी जाणवले होते. आज अचानक आलेल्या या धुळीच्या लोटांनी याच वादळाची आठवण करून दिली.

हे ही कमी म्हणून की काय काही वेळाने अचानक ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागल्याने नक्की निसर्गाचे काही तरी बिनसले आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा