इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजन
कल्याण दि.30 जानेवारी :
बदलत्या जीवन शैली आणि बदलत्या राहणीमानाचा महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठे परिणाम झाल्याचे दिसत आहे. परंतू एवढे होऊनही महिलांच्या या समस्यांवर आवश्यक तेवढी सामाजिक चर्चा होताना दिसत नाहीये. नेमका हाच धागा पकडून इंडीयन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे ‘गप्पा मायलेकींच्या या विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याद्वारे महिलांच्या या मानसिक आणि शारीरिक समस्यांवर प्रकाशझोत टाकून उपायांच्या दृष्टीने मंथन केले जाणार असल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.
येत्या ८ फेब्रुवारी २०२३ रोजी कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात दुपारी ४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्री चिन्मयी सुमित, कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांच्यासह डॉ. वर्षा फडके, डॉ. सोनाली चौधरी, डॉ. सफीया फरीद, डॉ. नितीन पाटणकर, डॉ. प्रशांत पाटील हे तज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.
महिलांमधील वाढते पीसीओडी आजार, अनियीमित मानसिक पाळी, स्थूलता आणि वजन वाढ, तणाव यासोबतच गर्भवती महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडणाऱ्या विविध प्रश्नांचाही या कार्यक्रमात ऊहापोह केला जाणार आहे. तर महिलांमधील आजारांचे शास्त्रीय तसेच धार्मिक दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे आयएमए कल्याणतर्फे सांगण्यात आले.
हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून त्याला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
याठिकाणी उपलब्ध होणार नोंदणी आणि मोफत पास…
1) निदान डायग्नोस्टिक सेंटर, रामबाग कल्याण पश्चिम
2) वैष्णवी हॉस्पिटल, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम
3) पानसरे पॅथोलोजी , खडकपाडा कल्याण – पश्चिम
4) फडके हॉस्पिटल , पारनाका, कल्याण – प
5) साईकृपा हॉस्पिटल, पुणे लिंक रोड, कल्याण पूर्व
संपर्क : 9372489357 / 98201 33908