कल्याण ग्रामीण दि.२४ डिसेंबर :
मुंब्रा -दिवा-कोपर डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता गेल्या कित्तेक वर्षांपासून कागदावरच राहिला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी निवडून आल्यापासून या समांतर रस्त्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. यावर नुकतीच ठाणे मनपा आयुक्तांची बैठक पार पडली असून ठाणे मनपाने एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता रेल्वे समांतर रस्त्याच्या कामाला आता गती येणार आहे.
कल्याण शिळ रस्त्यावरील वाढत्या नागरी वस्तीचा आणि वाहनांचा विचार करता डोंबिवली मुंब्रा-दिवा-कोपर- डोंबिवली ( रेतीबंदर ते दिवा गावापर्यंत ) या समांतर खाडीच्या बाजूने मंजूर असलेल्या रस्त्याचे काम करणे गरजेचे झाले आहे. २००७ मध्ये सर्वेक्षण झालेला हा रस्ता ठाणे मनपाच्या विकास आराखड्यात देखील समाविष्ट आहे. मात्र या रस्त्यासाठी पाठपुरावा न झाल्याने तो कागदावरच राहिल्याने त्याचे काम प्रत्यक्ष करणे गरजेचे आहे. या रस्त्याचे काम झाल्यास कल्याण डोंबिवली सह आजूबाजूच्या शहरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर आता ठाणे मनपाने देखील एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. रेल्वे समांतर रस्ता हा ४ हजार ८५० मी. लांबीचा असून ३० मी. रुंदीचा आहे. तर पुलाच्या स्वरूपातील रास्ता हा १७.५० मी. आहे. या समांतर रस्त्यासाठी अंदाजे ६५१.७४ कोटी रुपयांचा खर्च वर्तवण्यात आला आहे. एमआरडीएने या प्रकल्पास मंजुरी आणि सहमती दाखवल्यास प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार आहे. मात्र सद्यपरिस्थितीत या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याचे कारण महापालिकेने पुढे केले आहे.त्यामुळे एमएमआरडीए कडे ठाणे मनपाने आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी आणि मंजुरी मिळण्यासाठी एमएमआरडीएला प्रस्ताव सादर केला आहे.
हिवाळी अधिवेशनात घेतली मुख्यमंत्र्यांचीही भेट…
यासाठी रेल्वे समांतर रस्त्यासाठी तत्कालीन डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार कै. हरिश्चंद्र पाटील यांनी डोंबिवली मुंब्रा समांतर रस्ता तयार करण्याची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समर्थन दर्शवल होत. मात्र पाठपुरावा झाला नसल्याने रस्ता कागदावरच राहिला होता. यानंतर मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला होता. सतत ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय हाती घेत रस्त्यासाठी आग्रही मागणी करत होते. या नंतर सध्या सुरु असलेल्या नागरपूर येथील हिवाळी अधिवेशन काळखंडात महाराष्ट्राचे ठाणे जिल्ह्यातील पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची देखील या रस्त्यासाठी तातडीने पाऊले उचलून काम मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता रेल्वे समांतर रस्त्याच्या कामाला गती येणार असल्याचे दिसून येत आहे.
न्यूज देता दाखवता आम्हाला वाचून मनापासून आनंद होतो फक्त मला एक सत्यता आणि दिव्याच्या जंक्शन सारख्या ठिकाणी त्या गावात शहरात एक ही जागा आजपर्यंत रेसिडेन्स म्हणजे R ZONE green zone आणि सरकारी सामग्री आज पर्यंत का नाही कश्यामूले आणि कुठल्या नेत्यांन मूळे अधिकार्यांन मूळे कुठल्या कारणास्तव उभारणी किंवा काया पालट करण्यात का आला नाही किंवा दिव्याच्या नकाशात डेव्हलपमेंट लीगल म्हणून शेराच नाही आहे का? ????
म्हणुन ते पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे कायापालट का करण्यात आला नाही या सगळ्या गोष्टींचा प्रश्नांची उत्तरे मिळतील आपल्या पेपर मधून अशी आशा बाळगतो जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र
टीप —>>>> मी कुठल्याही पक्षाच्या वतीने बोलत नाही आणि मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही फक्त एक सामान्य नागरिक स्थानिक भूमीपूत्र रहिवासी आहे म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला तूमच्या कडे? ????…..