कल्याण ग्रामीण दि.4 नोव्हेंबर :
मलंगगडाच्या पश्चिमेला असलेल्या कुंभार्ली येथे “वसुधैव कुटुंबकम” पीठाच्या वतीने राम कृष्ण हरी नामजप संकीर्तन पर्व सुरु आहे. या सोहळ्याला मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी उपस्थिती लावली. तसेच गळ्यामध्ये टाळ आणि मुखी मुखी “राम कृष्ण हरी”चा गजर करीत इथल्या वारकऱ्यांच्या रिंगण सोहळ्यात आमदार राजू पाटील उस्फुर्तपणे सहभागी झाल्याचेही दिसून आले.
ठाणे आणि यगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वसुधैव वसुधैव कुटुंबकम” पीठाकडून गेल्या १४ वर्षांपासून “राम कृष्ण हरी” जप सोहळा आयोजित करण्यात येत असतो. या पिठाचे आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री अनेक वर्षांपासून तरुणांना अध्यात्माचे मोफत धडे देत आहेत. तसेच ठिकाणी वर्षाचे बाराही महिने देशभरातील अध्यात्मिक संत हे भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी येत असतात. मलंगगडावर होणाऱ्या ललिता पंचमी उत्सवात या आध्यत्मिक पिठातील विद्यार्थ्यांची दिंडी आणि वेशभूषाही उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते.
या कार्यक्रमात मनसे आमदार राजू पाटील यांनी उत्स्फूर्तपणे रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदवला. यावेळी आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख ह.भ.प.अजय महाराज पाटील, महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे डोंबिवली शहर संघटक तकदीर काळण , अंबरनाथ तालुका अध्यक्ष नकुल पावशे, नाऱ्हेण ग्रामपंचायतीचे सरपंच समीर भंडारी यांसह ठाणे – रायगड जिल्ह्यातील वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते.