कल्याण दि. २६ ऑक्टोबर :
कल्याण पूर्वेतील काटे मानवी परिसरात असणाऱ्या जुन्या वस्तूंच्या दुकानाला आज संध्याकाळी भीषण आग लागली. ज्याची झळ या दुकानातील वस्तूंसह त्याशेजारी असणाऱ्या गॅरेजमधील काही गाड्यानाही बसली.
ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत स्पष्ट माहिती नसली तरी फटाक्यांमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ही आग इतकी मोठी होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण पूर्वेसह कल्याण पश्चिम येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटना सकाळी दाखल झाल्या होत्या. अवघ्या काही मिनिटांत या आगीने रौद्र रूप धारण करत या जुन्या वस्तूंच्या दुकानासह बाजूला उभ्या असणाऱ्या गॅरेजला झळ बसली. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.