डोंबिवली दि.12 ऑक्टोबर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ढाल आणि तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून गणेश मंदिर येथे ढाल-तलवारीचे पूजन करत भक्तीभावाने आरती करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक गणेश मंदिर परिसरात उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांडून घोषणाबाजी करत ढाल- तलवार हातात घेत शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
हे सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असून त्यांना असेच यश मिळत राहो अंक कोणतीही अडचण यांचावर येऊ नको अशी प्रार्थना आम्ही गणपती चरणी केल्याची माहिती शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली. ढाल तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असून आम्हाला यापुढेही असेच यश लाभेल असा विश्वासही मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.