कोणी फ्रेंड रिक्वेस्ट न स्विकारण्यासह पैसेही न पाठवण्याचे आवाहन
कल्याण दि. 28 सप्टेंबर :
केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाने बनावट फेसबूक (Facebook)अकाऊंट उघडून फसवणुकीचा प्रयत्न होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या नावाने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी पाटील यांना तसेच त्यांच्या सोशल मिडिया टिमला प्राप्त झाल्या. त्यांची शहानिशा केली असता अज्ञात व्यक्तीने कपिल पाटील यांच्या नावे बनावट अकाऊंट उघडुन हे सर्व उद्योग केल्याचे समोर आले. त्यामूळे संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच कपिल पाटील यांच्या नावाने आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत, तसेच कोणीही पैसे पाठवू नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कोणाबाबत असा प्रकार झालेला असल्यास त्यांनी तातडीने कपिल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.