कल्याण दि. 25 सप्टेंबर :
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अभिवादन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय मातंग संघाच्या कल्याण शाखेतर्फे लालचौकी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे काही दिवसांपूर्वीच रशियातील मॉस्को येथे महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले होते. या पार्श्वभूमीवर अण्णा भाऊंना अभिवादन करण्यासाठी कल्याणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,जन कल्याण समितीचे अरुण देशपांडे यांच्यासह बंडू घोडे, चक्रधर घुले, अमोल जव्हेरी आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अखिल भारतीय मातंग समाज महिला आघाडी अध्यक्ष अवंतिका खंडागळे, व्दारकाबाई, गुलाब जगताप , रवी गवळी , सचिन कासार, सुजित रोकडे, रामदास साबळे, मोहन गवळी , रवी घुले , महादेव घुले, गणेश गवळी ,विनोद कांबळे , गणेश गवई , राहुल उकांडे, आकाश घुले ,नाना साबळे ,रोहित कांबळे ,परमेश्वर लाखे ,संजय कांबळे ,अरुण दादा सकर, प्रदीप रोकडे ,राजू घुरदेव हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.