Home ठळक बातम्या डॉ. विजय सुर्यवंशी यांची बदली; कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे

डॉ. विजय सुर्यवंशी यांची बदली; कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे

 

कल्याण डोंबिवली दि.१२ जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य शासनाकडून डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे (आय ए एस) यांची आज नियुक्ती करण्यात आली. आज संध्याकाळी राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

डॉ. विजय सुर्यवंशी यांची लक्षवेधी कारकीर्द…
केडीएमसीचे मावळते आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे त्यांची कारकीर्द लक्षवेधी अशी ठरली. आयुक्तपद स्विकारल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्या लोकाभिमुख कामाची चुणूक दाखवून दिली. कोवीड काळात तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारलाही घेण्यास भाग पडले. कोवीड काळ असूनही कल्याण डोंबिवलीतील विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षे रखडलेल्या विविध विकासकामांना त्यांनी केवळ गतीच दिली नाही, तर कित्येक कामे पूर्णत्वासही नेली. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीकरांच्या मनामध्ये केडीएमसी प्रशासनाबाबत निर्माण झालेला अविश्वास आणि नकारात्मक छबी बदलण्यात डॉ. विजय सुर्यवंशी यांचे काम हा सिंहाचा वाटा ठरला. तसेच पूर्वी वेगवेगळ्या दिशेला तोंड असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही त्यांनी आपल्या कार्यशैलीच्या बळावर एकत्र आणत त्यांच्यामध्ये शहरांबाबत आपुलकी निर्माण केली. लोकाभिमुख प्रशासन कसे असावे आणि प्रतिकूल परिस्थितीतही विकासाभिमुख काम कसे करावे याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. विजय सुर्यवंशी यांची ही कारकीर्द म्हणावी लागेल.

तर नवनियुक्त आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. अनेकविध योजना आणि प्रकल्पांच्या माध्यमातून चिराग जिल्हा परिषदेचा कारभार ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून तेही कल्याण डोंबिवलीला विकासाच्या मार्गावर नेतील अशी आशा बाळगण्यास हरकत नसावी.

१ कॉमेंट

  1. Why you giving credits to to mr suryavanshi??? Just check kayan shil road and its quality.. Just check kdmc roads and its current position.. he did nothing. He just looted our taxes and now yet another ias officer who loot us again with no development but pet of political leader

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा