डोंबिवली दि. ९ जुलै :
घरफोडीच्या गुन्ह्यातील ३ सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केलाआहे. अभिजीत रॉय, इम्रान खान आणि रियाज खान अशी या चोरट्यांची नावे आहेत.
अभिजीत रॉय याचा सोने गाळण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तो घरफोडी करत सोने चोरायचा मार्ग पत्करला. अभिजीतविरोधात याआधी मुंबई , मिरा भाईंदर परिसरात तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत. डोंबिवलीतील ६ गुन्हे उघड केले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी ७१ तोळे सोने आणि २५ तोळे चांदी असा ३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच इम्रान खान आणि रियाज खान या दोघा सराईत चोरट्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
मानपाडा पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरपोडीचे प्रकार वाढले होते या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध सुरू केला .सीसीटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे एका आरोपीला अटक केली. अभिजीत रॉय असं आरोपीचं नांव आहे. मुळचा पश्चिम बंगालच्या असलेल्या अभिजित रॉय हा भायखळा परिसरातील कामाठीपुरा परिसरात राहतो. त्याने सोने गाळण्याच्या व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चोरीचा घरफोडीचा धंदा निवडला होता. मुंबई वरून डोंबिवली आणि वसई विरार पर्यत ट्रेनने प्रवास करत तो घराला कुलूप असलेले आणि फोडताना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत असे सुरक्षा रक्षक नसलेले घर निवडायचा आणि कडी कोयंडा उचकटून घरफोडी करत असे. त्याच्याकडून मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी ७१ तोळे सोने आणि २५ तोळे चांदी असे ३६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . त्याच्या विरोधात वसई विरार येथे १३ गुन्हे दाखल आहेत ९ महिन्यापूर्वी तो जेल मधून सुटून आला होता.
तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले इम्रान खान आणि रियाज खान या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख १८ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .त्याच्याकडून मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. हे दोघे एमआयडीसीमधील बंद कारखान्यातील छोट्या मोठ्या साहित्यची चोरी करून भंगारात विकून उपजीविका करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मागील काही दिवसात डोंबिवली एसीपी सुनील कुराडे ,मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, एपिआय अविनाश वणवे ,सुनील तारमळे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने आरोपीचा माग काढत १० गुन्हे उघडकीस आणत तीन जणांना अटक केली आरोपींकडून चोरीचा ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.